उस्मानाबाद /प्रतिनिधी -

ओ. बी. सी. स्थानिक स्वराज संस्थे मधील राजकीय आरक्षण मिळावे व ओ. बी. सी. मंत्री विजय वड्डटीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी भाजपा ओबीसी मोर्चाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन.

ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डाटा सादर करा असे भाजपा ओबीसी मोर्चा सुरुवाती पासून शासनास सांगत होतो. परंतु महाविकास आघाडीचे नेते व मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यात मग्न होते. वर्षभरानंतर मागासवर्ग आयोग गठीत केला तर त्यांना निधी उपलब्ध करुन दिला नाही. मध्यप्रदेश सरकारने मागास आयोग नेमूण इम्पेरिकल डाटा व ट्रीपल टेस्ट पुर्ण करुन सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण टिकविण्यात मध्यप्रदेश सरकार यशस्वी झाले. परंतु महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणापासून महाराष्ट्रातील ओबीसी समाज वंचित राहिला. ओबीसी आरक्षणाची हत्त्या महाविकास आघाडी सरकाने केलेली आहे.  त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा कसलाही ‍ अधिकार नाही. यासाठी भाजपा ओबीसी मोर्चाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. विजय शिंगाडे, प्रदेश चिटणीस ‍पिराजी मंजुळे, प्रदेश कार्यकारीनी सदस्य  ॲङ  खंडेराव चौरे,  भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के, इंद्रजित देवकते, गुलचंद व्यवहारे, पांडुरंग लाटे सर, आनंद कंदले, सावता माळी, सतिश वैद्य, भास्कर बोंदर, नंदकुमार माळी, वैभव हंचाटे, लक्ष्मण माने, महेंद्र बिदरकर, उस्मानाबाद शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सुळ, प्रमोद बचाटे, राजाभाऊ सोनटक्के, सतीश कदम, दाजी आप्पा पवार, सुनिल पंगुडवाले आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top