तुळजापूर  / प्रतिनिधी-

 यंदाचा वर्षी भर पूर पाऊसकाळ असल्याचा अंदज  अचुक हवामान तज्ञ पंजाबराव डख  यांनी श्रीतुळजाभवानी दर्शन घेतल्यानंतर   प्रयोगशील शेतकरी ग्रुप व  विशाल रोचकरी मिञ परिवार यांच्या वतीने डख यांचा  शाल, श्रीफळ, देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल रोचकरी, बाबासाहेब खपले, नानासाहेब रोचकरी, प्रा. विवेक गंगणे , विशाल गंगणे उपस्थित होते

यावेळी बोलताना डख म्हणाले की, मी सेलु (ता.परभणी) येथील  गरीब शेतकरी कुटुंबातील असुन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मला पहावत नसल्यामुळे मी नैसर्गिक आपतीचे कारणे शोधले व सेटलाईट माध्यमातून अभ्यास करुन पावासाचे अंदाज वर्तविण्यास आरंभ केला ते सत्यत उतरु लागले  तिर्थक्षेञ तिरुपती येथील ढगफुटीचा अंदाज मी वर्तवला होता तो सत्यत उतरला यंदा पावसाळा २० किंवा २१ मेला आरंभ होणार असुन तो सतत पडणार पाऊसकाळ जास्त आहे.

ज्यांना  लग्न भव्यदिव्य करावयाचे आहेत असे श्रीमंत व नेते मंडळी लग्नाची तारीख   काढायाचा आधी ते  माझ्याकडे प्रथम येवुन पावासाचा अंदाज घेवून  मग लग्नाचा  तारखा काढतात,असे यावेळी म्हणाले 


 
Top