उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहर व तालुक्यातील अनेक युवकांनी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, खा.राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. उस्मानाबाद शहरातील गांधी स्मृती काँग्रेस भवन येथे आज (दि.17) हा प्रवेश सोहळा पार पडला.

 यावेळी शाकेर चाँदसाब शेख, मोहसीन पठाण, आसिफ तांबोळी, लतिफ शेख, अकिब काझी, झायेद डोंगरे, कादर शेख, मेहराज शेख, नूर पठाण, सादिक काझी यांच्यासह अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. काँग्रेसच्या विचारांची आज देशाला गरज असून युवकांनी पक्षाचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवावा असे आवाहन अ‍ॅड. पाटील यांनी केले.

 यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन प्रवेश केलेल्या युवकांना पक्षात नेहमीच सन्मानाची वागणूक दिली जाईल असे सांगितले.

 पक्ष प्रवेशासाठी सांस्कृतिक विभागाचे  प्रदेश संघटक तालुका सरचिटणीस अहेमद चाऊस यांनी या युवकांना प्रोत्साहित केले. यावेळी  जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.धीरज पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद,  जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश संघटक अहमद चाऊस, असंघटित कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष कफील सय्यद, जिल्हा सरचिटणीस जमीर सय्यद, मानवाधिकार विभागाचे जिल्हा सचिव महेमूद शेख आदी उपस्थित होते.

 
Top