उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हुतात्मा गणपतराव देशमुख बहुउद्देशीय स्मारक समिती काटी  यांच्या वतीने रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आज दिनांक 5 मे रोजी सन्मान करण्यात आला.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश दापके होते, कार्यक्रमाचे प्रस्ताविक हुतात्मा गणपतराव देशमुख बहुउद्देशीय स्मारक समितीचे सर्वेसर्वा डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केली, तर आभार अर्चना देशमुख यांनी  मानले.

 याप्रसंगी इतिहास अभ्यासक डॉ. सतीश कदम यांचे मराठवाडा मुक्तिसंग्राम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात काटी गावच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

 अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.रमेश दापके म्हणाले की, ज्या माणसाच्या डोक्यात नवीन कल्पना आहेत, नवीन संकल्पना आहेत.अशा लोकांच्या पाठीवर हात ठेवण्याचे महत्त्वाचे काम आपण केले आहे. कार्यकर्तृत्वाचा सन्मान होणे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मत डॉ.रमेश दापके यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उस्मानाबाद शहरातील नागरिक पत्रकार बंधू-भगिनी उपस्थित होते.

 
Top