तेर  (प्रतिनिधी)

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री.लक्ष्मी नृसिंह मंदिर परिसरात भाविकभक्त यांच्या  लोकसहभागातून बालोद्यान साकारले आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री. लक्ष्मी नृसिंह मंदिर परिसरात लोकसहभागातून बालोद्यान व्हावे ही संकल्पना मंदिराचे पुजारी नरहरी बडवे यांची इच्छा होती.ही संकल्पना भाविकभक्त यांच्याकडे मांडली.कारण तेर येथे बालकांना खेळण्यासाठी बालोद्यान नाही.ही संकल्पना भाविकभक्त यांना मनापासून आवडली.उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री.अमोल कस्तुरे यांनी लोखंडी डबलबार बसविला.तर श्री.रणजितसिंह चव्हाण यांनी लोखंडी सिंगलबार बसविला तर लोखंडी सीसाॅ श्री.संदिप कचरे यांनी बसविला.तर लोखंडी पाळणा सादिक तांबोळी व गोरख माळी यांनी बसविला आहे.तर घसरगुंडी श्री.विजयकुमार इंगळे यांनी बसविली आहे.दुसरा  लोखंडी सीसाॅ श्री.राजाभाऊ आंधळे यांनी बसविला आहे.तर दुसरा लोखंडी सिंगलबार श्री.दत्ता कोळी यांनी बसविला आहे.बालोद्यानमुळे सकाळी व संध्याकाळी बालके व युवक खेळाचा आनंद घेत आहेत.बालोद्यानमुळे मंदिर परिसरात खेळण्यासाठी बालकांची वर्दळ वाढत आहे.

 
Top