उस्मानाबाद / प्रतिनिधी :-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अर्थसहाय्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  यश मेडिकल फाउंडेशन आयोजित व्यसनमुक्ती मॅरेथॉन स्पर्धा मंगळवार (दि .12 एप्रिल रोजी येरमाळा येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली.

    मॅरेथॉन रॅलीची सुरुवात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे निरिक्षक युवराज भोसले , वरिष्ठ लिपिक बी.डी. सिरसट . येरमाळा पोलिस  स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मोरे. यश मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे ,माजी जि प सदस्य मदन बारकुल यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

 शालेय विद्यार्थी वयोगटातील मुलं-मुली, खुला वयोगटातील   मुलं-मुली,यामध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. प्रथम द्वितीय तृतीय  क्रमांकाना बक्षिस वितरण करण्यात आले.

  खुल्या वयोगटातील मुलांच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम ज्ञानेश्वर खेडकर कमांडो करिअर अकॅडमी   परंडा , द्वितीय विशाल देशमुख सापनाई, तृतीय शुभप वाघ नारेवाडी

खुल्या वयोगटातील मुलीमध्ये प्रथम अत्फीया मुलानी शिवराज अकॅडमी  बाशी . द्वितीय भाग्यश्री टोपे कमांडो अकडॅमी परांडा ,    ऐश्वर्या खांडेकर कमांडो अकॅडमी परंडा

 शालेय गटातील मुलांमध्ये ओंकार भारती जवाहर विद्यालय येडशी द्वितीय चेतन चौगुले महादेव गवार क्रीडा मंडळ येडशी तृतीय रवी पवार महादेव गवार क्रीडा मंडळ येडशी

 शालेय गटातील मुलीमध्ये प्रथम सोनाली शिंदे महादेव गवार क्रीडा मंडळ येडशी  द्वितीय वैष्णवी साळुंखे परांडा तृतीय पायल वनवे दक्ष अकडमी चिंचोली

लहान गटात प्रथम अजित भातलवंडे जि प प्रशाला दहिफळ द्वितीय समर्थ गायकवाड राजीव गांधी विद्यालय पानगाव परतापुर तृतीय परशुराम जमदाडे येरमाळा

     प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10,000 रुपये ट्राफी व प्रमाणपत्र  द्वितीय क्रमांक 7,000 रुपये ट्राफी व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकाचे 5,000रुपये ट्रॉफी व प्रमाणपत्र असे स्वरूप होते.

 या स्पर्धेमध्ये दहिफळ येथील जिल्हा परिषद माध्यमिक माध्यमिक येथील समता विद्यालय पानगाव येथील राजीव गांधी विद्यालय ,येरमाळा येथील ज्ञानोदयोग विद्यालय,शेलगाव ( दि) येथील मदर तेरेसा विद्यालय   लक्ष अकॅडमी चिंचोली ,करियर कमांडो करिअर अकॅडमी परांडा ,महादेव क्रीडा मंडळ येडशी उस्मानाबाद येथील ॲकॅडमी सह 600  विद्यार्थी व युवकांनी  सहभाग नोंदवला .     बक्षीस वितरण समारंभ पोलीस उपअधीक्षक एम रमेश सामाजिक कार्यकर्ते लहू बारकूल यश मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .

 यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक एम रमेश म्हणाले की ग्रामीण भागात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.यावेळी योगामध्ये गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हिंदवी परमेश्वर चौरे,कोथळा येथील कुस्तीपटू सोनाली शिंदे  येरमाळा येथील रेसलिंग मध्ये गोल्ड मेडल सृष्टी जमदाडे यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

   कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. संदीप तांबारे यांनी सूत्रसंचालन अश्विनी डिसले यांनी केले तर आभार प्रा तुषार.वाघमारे यांनी मानले.

  कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष जमदाडे ,बापूराव चांदणे , सोहेल पठाण ,नामदेव बोंदर  महावीर तनपुरे, पांडुरंग मते, सचिन पाटील अक्षय घोलप , यशवंत चव्हाण ,  शंकर सावंत ,नवले सर व यश मेडिकल फाउंडेशनचे  सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


 
Top