उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत सुक्ष्म दस वार्षिक कृषी आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उस्मानाबाद तालुक्यातून केवळ तीन गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सारोळा (बुद्रूक) गावाचा समावेश असून १० वर्षाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

सारोळा (बुद्रुक) येथील श्री मारूती मंदिरात उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी व गटविकास अधिकारी श्री तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध कामांचा आढावा घेवून कृती आराखडा संदर्भात माहिती देण्यात आली. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुक्ष्म दस वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी १० वर्षांच्या एकूण २६२ कामाचे नियोजन गत दोन दिवसांपासून करण्यात येत आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन त्या लाभार्थ्यांना कामाची माहिती सांगून ज्या कामाची आवश्यकता आहे, अशी कामे व लाभार्थ्यांची करण्यात येणार आहे. ही निवड करून पुढील दहा वर्षांच्या आराखड्याचे नियोजन ग्रामपंचायत व पंचायत समिती करत आहे. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री जाधव, लोकनियुक्त सरपंच प्रशांत रणदिवे, मंडल अधिकारी श्री कोळी, गाव कामगार तलाठी वायचळ, ग्रामविकास अधिकारी कदम, ग्रामपंचायत सदस्य सुजित बाकले, सुधाकर देवगिरे, पंडित देवकर, रमेश रणदिवे आदींसह पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेचे सर्व अधिकारी, बचत गटांच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. 


 
Top