तुळजापूर (प्रतिनिधी) 

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात कामेगाव व परिसरातील सर्व वयोगटातील ३१५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री धनंजय रणदिवे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे वि.का.चे चेअरमन भैरवनाथ पवार, मारुती कदम, वसंत मुंडे, फुलचंद कदम, तेजस सुरवसे, मनोज पाटील, नवनाथ कदम, मुकुंद मोरे, उध्दव मोरे, श्रमीक कदम, उदय पाटील, नामदेव झोरे, युवराज पवार, मनोज मोरे, सिध्दार्थ कदम, संतोष पाटील, फारुक सय्यद, नानासाहेब पाटील, राहूल कदम, जीवाजी कदम, पांडूरंग पूरी, सुर्यकांत बचाटे, पांडूरंग चव्हाण, धनंजय मोरे, बबन कदम, मुख्याध्यापक चव्हाण सर, व प्रास्ताविक डॉ.उकीरडे सर यांनी केले. तसेच समुद्रवाणी उपकेंद्राचे संतोश राठोड, म्हेत्रे पी.एन. वैशाली भागवत व आशा कार्यकर्त्यां, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी मुंबईचे डॉ अजित निळे, डॉ आनंद यादव, डॉ.अन्सु कुमार, डॉ. ऋषीकेश जाधव, डॉ. गौतम फुलारा, डॉ परविन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे, यांनी परीश्रम घेतले.


 
Top