उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

रामतीर्थ देवस्थान मोठा धार्मिक वारसा लाभलेले अतिशय पवित्र व प्राचीन निसर्गरम्य तीर्थक्षेत्र असून हे देवस्थान पर्यटनाच्या दृष्टिकोनातून परिपूर्णपणे विकसित करण्याचा मानस आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना व्यक्त केला. यावेळी रामतीर्थ देवस्थानचे महंत श्री.विष्णुप्रसाद शर्मा महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

 साक्षात प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामतीर्थ, ता. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रुपये ८० लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून दोन टप्प्यात आमदार निधीच्या माध्यमातून रुपये २० लक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या एकूण रुपये १ कोटीच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये सभागृह, भव्य प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, पेवर ब्लॉक व बगीच्या आदी कामे घेण्यात आली आहेत. या देवस्थानच्या विकासासाठी एकाचवेळी पहिल्यांदाच एवढा मोठा निधी देण्यात आला आहे.

 लाखोंच्या संख्येने भाविक श्रद्धेने येथे येत असतात. भाविकांना या ठिकाणी चांगल्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास भाविकांच्या संख्येत आणखीन वाढ होऊन पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास निधीतून टप्प्या टप्प्याने यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यात येईल. या भागाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने निधीची कमतरता भासणारही नाही, आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून निश्चितच या तिर्थक्षेत्राचा कायापालट करू. रामनवमीच्या मंगल मुहूर्तावर या कामाला सुरुवात करण्यात आली असून रामरायाच्या आशीर्वादाने लवकरच हे कार्य पूर्णत्वास जाईल, असा विश्वास आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.दीपक आलूरे, गणेश सोनटक्के, श्री.सुशांत भूमकर,भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुशांत भूमकर, भाजपा युवा मोर्च्याचे सचिव श्री. श्रमिक पोतदार, श्री.दयानंद मुडके, श्री.पद्माकर घोडके, श्री.बलभीम मुळे गुरुजी, श्री.प्रभाकर घोडके, श्री.बंडू पूदाले यांच्यासह मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.


 
Top