उस्मानाबाद / प्रतिनिधी-

व्यक्तिमत्त्व विकासासाठी इंग्रजी भाषा अत्यावश्यक असल्याचे मत प्राध्यापक सर्जेराव दोलतोडे यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तीस दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून  प्रा. सर्जेराव दोलतोडे बोलत होते.

     प्रा. दोलतोडे पुढे म्हणाले की, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या चार मूलभूत गोष्टींवर भर देणे गरजेचे आहे. उत्तम संवाद कौशल्य हे व्यक्तिमत्व विकासाचा अविभाज्य  घटक आहे. इंग्रजी भाषेमुळे उत्तम संवाद कौशल्य आपोआप प्राप्त होते. इंग्रजी भाषेमुळे जागतिक पातळीवरील ज्ञान प्राप्त होऊन व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.

    सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षेचे समन्वयक डॉ.मारुती अभिमान लोंढे , ऑप्टीमल कंपनीचे समन्वयक प्रमोद पवार ,डॉ.लक्ष्मण बरगंडे आणि  महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top