उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त व  राष्ट्रपीता महात्मा जोतिराव फुले आणि महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्यांचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यामध्ये “सामाजिक समता सप्ताह”निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्हयामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत दि.6 एप्रिल ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत विद्यार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

 बारावी  विज्ञान शाखेतील विद्यार्थी,सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्ष विद्यार्थी यांनी आवश्यक पुराव्यासह समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन   जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष बी.जी. पवार यांनी केले आहे.

 
Top