उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे नियमितपणे राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत टाक्यांचे, बिनटाक्यांची महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरे आयोजित केली जातात. दरवर्षी 500 ते 600 कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया नियमितपणे पार पाडल्या जातात. त्याचाच भाग म्हणून दि.05 एप्रिल रोजी मोफत महिला कुटुंब नियोजन बिनटाका (Laparoscopic) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठी इच्छुक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया पात्रता तपासणी सोमवारी दि.04 एप्रिल रोजी 10 महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि 05 एप्रिल रोजी त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. हे शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये बिनटाका सर्जन डॉ.खारे यांच्याद्वारे करण्यात आली. शिबीरामध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या प्रभारी अधिष्ठाता आणि प्रसूतितंत्र व स्त्री रोग विभागाच्या विभागप्रमुख डॉ.वीणा पाटील तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ.उमेश अगावणे उपस्थित होते. यावेळी स्त्री रोग विभगातील पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते. 

 
Top