उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा हिवताप कार्यालयाअंतर्गत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आज दि.25 एप्रिल 2022 रोजी  जागतिक हिवताप दिनानिर्मित्त किटकजन्य आजाराबाबत आरोग्य प्रदर्शन भरविण्यात आले आणि त्यामध्ये जनतेस किटकजन्य आजाराविषयी माहिती सांगण्यात आली.

 यावेळी जागतिक हिवताप दिनानिमित्त भरविण्यात आलेल्या आरोग्य प्रदर्शन स्टॉलचे जि.प. चे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हालगुडे यांच्या हस्ते हिवतापाचे जनक सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.या आरोग्य प्रदर्शनास डॉ.फुलारी, डॉ.पांचाळ, जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती डॉ.चौधरी, साथरोग वैद्यकीय अधिकारी श्रीमती सुकाळे, विस्तार अधिकारी (आरोग्य)  शरद हिंगमीरे, जि.प.चे आरोग्य सहाय्यक श्री .मोरे आणि जिल्हा हिवताप कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

 आरोग्य प्रदर्शनाचे उद्घाटनाच्या वेळी डॉ.हालकुडे यांनी किटकजन्य आजाराविषयी प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच इतर डेग्यू,चिकुनगुनीया आजाराबद्दल काय कार्यवाही करावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

आरोग्य प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयातील अधटराव आ.स., किटक संमाहारक सोळंके, जोशी, राजमाने, प्रयोग शाळा वैद्यकीय अधिकारी गोरे आणि कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.

 
Top