उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा उस्मानाबाद येथे आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज (दि.31) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर फुले फेकून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

’द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडलेले मत न रुचलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्ली येथे मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ उस्मानाबादेत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आप कार्यकर्त्यानी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर फुले फेकून गांधीगिरी आंदोलन केले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष आकाश कावळे,कमलाकर ठवरे, मुन्ना शेख, तानाजी पिंपळे, शहाजी पवार, उस्मान तांबोळी, अंकुश चौगुले, प्रेमकुमार वाघमारे, किरण शिंदे, नामदेव वाघमारे, संगाप्पा बेद्रे, रघु गोरे आदी सहभागी झाले होते.


 
Top