उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पेट्रोल-डिझेल-गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोटार सायकलचे दहन करून आंदोेलन करण्यात आले. यावेळी एमएच २५ चा बोर्ड बैलगाडीला लावून संजय पाटील दुधगावकर, सुरेश बिराजदार, प्रतापसिंह पाटील, यांच्यासह कांही कार्यकर्ते आंदोलनाच्या स्थळी आले. 

गुरूवार दि.७ एप्रिल राेजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने वाढत्या महागाईच्या निषेधात आंदाेलन करण्यात आले. महागाईमुळे सर्व सामान्य लोकांची डोकी दुखी झालेली आहे. त्यामुळे झेंडूबामचे वाटप ही करण्यात आले. केंद्र सरकारच्या निषेधात मोटारसायकलवर पेट्रोल टाकून जाळण्यात आली. यावेळी अचानक बढका उडाल्यामुळे एकच गांेधळ झाला. या आंदोलनात  जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,माजी नगराध्यक्ष संपत डोके, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश मसुद शेख,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल ,प्रतापसिंह पाटील , उस्मानाबाद कळंब विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे,प्रभारी महिला जिल्हाध्यक्ष महिला मनीषा पाटील, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष सुरेखा जाधव, महिला अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश एखंडे, उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज शेख,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे, शेखर घोडके , रणवीर इंगळे, महेश नलावडे , आळणी सरपंच प्रमोद विर, वाहतूक नियंत्रण जिल्हाध्यक्ष विवेक घोगरे,मीनल काकडे ,राजकुमार पवार अन्वर शेख ,बिलाल तांबोळी, बाबा मुजावर,उस्मानाबाद शहर  युवक शहर कार्याध्यक्ष रॉबिन बागडे, दत्तात्रय पवार, प्रशांत फंड, तेजस भालेराव, नितीन चव्हाण, युवा नेते मृत्युंजय बनसोडे, शहर उपाध्यक्ष अनिकेत पाटील, अजय कोळी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top