उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गुंजोटी, ता. उमरगा येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गुंजोटी एकोंडी-एकोंडीवाडी ते दाबका किमी (०/०० ते ८/८५० किंमत ६४७.३२ लक्ष) व लोहारा तालुक्यातील माकणी (जुनी) ते सास्तुर (जुने) (किमी ०/०० ते ७/०० रु .५३०.६५ लक्ष) या दोन्ही मंजूर कामाच्या रस्त्याचे उद्घाटन समारंभ उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर , उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे  आ. ज्ञानराज चौगुले यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी बोलताना, सदर रस्ता हा उमरगा शहरासाठी अत्यंत महत्वाचा असून या रस्त्याने संबंधित सर्व गावांचा थेट उमरगा शहराशी संबंध येऊन या ठिकाणची आर्थिक बाजारपेठ वाढण्यास आपणास मदत होणार आहे. या ठिकाणे मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत कसल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही त्यामुळे संबंधित काम करणारी कंट्रक्शन कंपनी आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे सर्व अधिकारी यांनी रस्त्याच्या दर्जा उच्च ठेऊन काम करावे अशी विनंती वजा सूचना संबंधितांना दिली. ज्याप्रमाणे आजपर्यंत आम्ही आपल्या गावच्या आणि आपल्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध होतो अगदी त्याचप्रमाणे यापुढेही आपल्यासोबत राहू असा विश्वास उपस्थितांना दिला.

याप्रसंगी श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे सचिव श्री. पतंगे सर, तालुकाप्रमुख उमरगा श्री. बाबुराव शहापुरे मामा, तालुकाप्रमुख लोहारा श्री. मोहन पणूरे साहेब, जिल्हा परिषद सदस्य श्री. दिपक जवळगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. सुलतान शेठ, माजी सभापती श्री. अच्युत साठे, पंचायत समिती माजी सदस्या श्रीमती. क्रांतीताई व्हटकर, नगरसेवक श्री अमोल बिराजदार, सरपंच श्रीमती सरस्वतीताई कारे, उपसरपंच श्री. आयुब मुजावर, सरपंच श्री. आप्पासाहेब पाटील, बालाजी कंट्रक्शनचे श्री. सुधीर माने, पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सुनीता ताई पाटील मॅडम, उप अभियंता श्री.कोरे साहेब, शाखा अभियंता श्री. महेश भगत यांच्यासह नागरिक, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top