उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य व निरोगी करण केंद्रात आता टेलिमेडिसिन सुविधा उपलब्ध आहे. यामुळे तज्ज्ञांमार्फत ग्रामीण भागातील रुग्णांचे निदान, सल्ला व उपचार करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्यासह सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापर वाढवून सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भाजपा पदाधिकारी बैठकीत रविवारी केले.

यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकार उस्मानाबाद जिल्ह्यात काहीच करत नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधानांनी उस्मानाबादचा समावेश आकांक्षीत जिल्ह्यात केला. हा हेतू साध्य करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मागील आठवड्यात नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांसमवेतची दिल्ली मध्ये दोन-तीन बैठका घेतल्या आहेत. केंद्राच्या माध्यमातुन टेक्निकल टेक्स्टाइल पार्क, सोलार पार्क व तुळजापूर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी प्रास्ताविकात जिल्हयातील रोगी आरोग्य व्यवस्था निरोगी करण्याची विनंती केली. त्यासाठी येरमाळा येथे ट्रॉमा केअर सेंटर, नळदुर्ग येथील ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर येथील १२४ भक्त निवासाचे सुरप स्पेशालिटी हॉस्पिटलचे रुपांतर करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. सूत्रसंचालन ॲड. नितीन भोसले यांनी आभार माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख, माजी जि. प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, अजित पिंगळे, सुनिल काकडे, पांडुरंग लाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, शिवाजी पंगुडवाले, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष नारायण नन्नवरे, युवराज नळे, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, मा.प.स.उपसभापती प्रदीप शिंदे, रामदास कोळगे यांच्यासह असंख्य भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 
Top