उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भीमनिर्णायक युवा समूहाच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक ९ एप्रिल २०२२ रोजी चक्रवर्ती  सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा चौकामध्ये अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ठीक अकरा वाजता करण्यात आले होते .

यावेळी प्रतिमेचे पूजन एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी जेष्ठ नेते जीवनराव गोरे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी  भीम निर्णायक युवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष सचिन दिलपाक , नगरसेवक तथा जिल्हा नियोजण समिती सदस्य सिद्धार्थ बनसोडे, माजी नगर सेवक व रमाई फौंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत, जागृती फौंडेशन चे विजय अशोक  बनसोडे, अतुल लष्करे ,गणेश वाघमारे ,संजय गजधने, बाबासाहेब कांबळे, राजू भाऊ गायकवाड, हिम्मत शिंगाडे, युवराज नाना पोळ, विष्णू भाऊ कांबळे, महादेव एडके, गणेश वाघमारे समाज बांधव व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते..  

 
Top