उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन शुक्रवार दि.०८ एप्रील २०२२ रोजी, आडसुळवाडी ता.कळंब येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात आडसुळवाडी व परिसरातील सर्व वयोगटातील ३६० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन अरुण चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे गोविंद अडसुळ, मारुती अडसुळ, बंकर शिंदे, जिवन गवारे, बाळासाहेब अडसुळ, रमाकांत चौधरी, बालाजी चौधरी, काकडे साहेब, अक्षय सुरवसे, शरद सुरवसे, राहुल अडसुळ, रामा चौधरी, निशांत अडसुळ, अविनाश गवारे, आकाश भोंगे, अंगनवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यां, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंबईचे डॉ अजित निळे, डॉ धवल रांका, डॉ अशीष पुरोहीत ,डॉ सिध्दांत रेलेकर, डॉ शुभम सिंगतकर, डॉ परविन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे यांनी परीश्रम घेतले.

 
Top