उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दीपक तानाजीराव तावडे तर व्हाइस चेअरमनपदी विकास माने बिनविरोध निवड झाली आहे. चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी आज (दि.12) नूतन संचालकांच्या बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली.

उस्मानाबाद नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक 22 फेब्रुवारी रोजी बिनविरोध झाली होती. निवडीनंतर आज चेअरमन व व्हाइस चेअरमन निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे एम.आर. आंबिलपुरे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत चेअरमनपदासाठी दीपक तावडे तर व्हाइस चेअरमनपदासाठी विकास माने यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी आंबिलपुरे यांनी घोषित केले. निवडीनंतर नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस संचालक रावसाहेब शिंगाडे, महादेव निंबाळकर, सादिक बागवान, तानाजी सुरवसे, अशोक देवकते, संगीता वाळा
, पारुबाई ओव्हाळ, श्री.पेठे, श्री.कोरवे आदींसह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top