उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयात  वादळी वारा, वीजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांसह अनेकांचे नुकसान झाले आहे. 

जिल्हयात शनिवार व रविवारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उस्मानाबाद, तुळजापूर, परंडा, उमरगा या तालुक्यात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काढणीला आलेल्या ज्वारी पिकांचे खळे सुरू असताना झालेल्या अवकाळी पावसाने कांही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे द्राक्षबाग, आंबा या फळबागांना ही फटका बसला आहे. आधिच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा फटका बसला आहे.त्यामुळे या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे. 

तीन जनवारे ठार

भूम तालुक्यातील रामकुंड परिसरात झालेल्या अवकाळी पावसात वीज पडल्याने दोन गायी व शेळीचा मृत्यू झाला आहे. महसूल विभागाच्या पथकाने या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला असल्याचे संागण्या आले. 

 
Top