उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज येथील जिल्हा रुग्णालयातील  बाह्य रुग्ण विभगात जनजागृतीपर कार्यक्रम  घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. “आपली पृथ्वी आपले आरोग्य” हे या वर्षाचा जागतिक आरोग्य दिनाचा घोषवाक्य आहे.

 वातावरणातील बदलामुळे होणारे परिणाम जसे की पृथ्वीवरील उष्णता वाढणे, अतिवृष्टी, अवेळी होणारा पाऊस,पूर,जमीन खचणे,जंगलात आग लागणे अशा घटनाचे प्रमाण वाढले आहे आणि त्याला मानवनिर्मित कारणे जसे की औद्योगिकरण ,वाहनांची वाढती संख्या आणि प्रदूषण, वायुप्रदूषण,वृक्षतोड हे कारणीभूत आहेत.वातावरणातील बदल तसेच त्यामुळे होणा-या परिणामामुळे दरवर्षी 13 दशलक्ष्य लोकांचा मृत्यू होतो.तसेच वायुप्रदुषनामुळे दर मिनिटाला 13 रुग्णांचा मृत्यू जगात होत आहे.

 ”स्वच्छ हवा , स्वच्छ पाणी व स्वच्छ पोषणयुक्त अन्न “सर्व नागरिकांना मिळणे तसेच शहरीभागात आणि लोकवस्ती प्रदूषणमुक्त होऊन राहण्याजोगी होण्याचे ध्येय आपल्यापुढे आता आहे.मानवनिर्मित पृथ्वीवरील बदलते वातावरण ,औद्योगिकरण आणि धकाधकीचे जीवन यामुळे दमा,कर्करोग,स्थूलता ,हृदयरोग ,पक्षाघात ,उष्माघात इत्यादीमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण तसेच टाळता येण्यासारखे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे.वाढत्या औद्योगीकरणमुळे होणारी वृक्षतोड याबाबत “झाडे लावा झाडे जगवा” ही संकल्पना लहान मुलापासून रुजवणे,वाहनांचा कमीत कमी वापरकरणे कचरा न जाळता कुजवून खत तयार करणे ,प्लास्टिकचा वापर बंद करणे ही काळाची गरज असून सर्वांनी या बद्दल विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.याबाबत सर्व जनतेस आवाहन करण्यात आले.

 जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून असंसर्गरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत सर्व आरोग्य कर्मचारी ,रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांचे रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून किमान ४०-४५  नागरिकांचे हेल्थ आय डी तयार करून संबंधितांना देण्यात आले.

  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचीकीत्सक डॉ.सचिन देशमुख ,कोविड नोडल ऑफिसर डॉ. आय. के. मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.तर डॉ.महेश कानडे व डॉ.नानासाहेब गोसावी ,डॉ.रवींद्र पापडे तसेच श्रीमती जाधव ,सहायक अधिसेविका आदींची उपस्थिती होती हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

 
Top