उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मंंबई येथे शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर एसटी महामंडळाच्या संपात सहभागी असलेल्या कांही कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यांच्या निषेधार्थात उस्मानाबाद शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुक आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे,  उस्मानाबाद जिला महिला राष्ट्रवादी काँग्रेस , राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, प्रतापसिंह पाटील, नितीन बागल ,शाम घोगरे, अमित शिंदे, विशाल शिंगाडे आदींनी सहभाग नोंदविला. माध्यमांशी बोलताना जीवनराव गोरे यांनी सदर घटनेचा निषेध करून शरद पवार यांनी गेल्या ३५ वर्षांत राजकारण व समाजकारण करताना अनेक समाज हिताचे व कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद मला मिळाल्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संसार सुखाचा कसा होईल, याकडे लक्ष देण्यास सांगून त्यंाची थकीत असलेली पावणे तीन हजार कोटीची देणी पवार साहेबामुळे देण्यात आली. समाज घडविण्यात एसटी महामंडळाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पवारांच्या मनात महामंडळा विषयी अस्था आहे, असे सांगितले. तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी राज्यात भाजपची सत्ता न आल्यामुळे सदावर्ते यांच्या माध्यमातून भाजप, असे प्रकार करीत आहे. अशा प्रकारामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करून सलगर यांनी सुरुवात भाजपने केली आहे, शेवट आम्ही करू असा इशारा दिला. 

 
Top