उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आज दिनांक ९ एप्रिल रोजी विश्वभूषण बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सां. वि.) यांच्या वतीने ई श्रम कार्ड व सदस्य नोंदणी अभियान भिम नगर क्रांती चौक येथे राबविण्यात आले.

 या कार्यक्रमचे उद्घाटन सकाळी ९ वाजता करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होत्या.या अभियानामध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२८ लोकांनी आपली नाव नोंदणी करून घेतली हा कार्यक्रम सांस्कृतीक विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. विशाल शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार करण्याकरता संघर्ष बनसोडे, सागर चव्हाण, अविनाश शिंगाडे, सुगत सोनवणे, सत्यजित माने, बापू साबळे, सिद्धार्थ सोनवणे व इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top