परंडा/प्रतिनिधी : - 

देवदर्शन करून निघालेल्या भाविकांचा काळाचा घाला या दुर्दैवी घटनेत २ जण ठार तर ११ जण गंभीर जख्मी ही घटना परंडा -सोनारी रोडवरिल खानापूर पाटी येथे बुधवार दि.१३ रात्री १० - ३० च्या सुमारास घडली.  शिखर शिंगणापूरहून देवदर्शन  कावड यात्रा करून निघालेल्या भूम तालुक्यातील नळीवडगाव येथील भावीकांचा पिकअप गावकडे जात आसताना परंडा - सोनारी रोडवरिल खानपूर पाटीजवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व पिकअप ची जोरदार धडक होऊन भिषण आपघात झाला आहे.

   या आपघाता मध्ये दोन जण जागीच ठार तर ११ जण गंभीर जख्मी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप , पोलिस पथका सह घटनास्थळी भेट दिली असता जख्मी यांना तात्काळ  येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.असून गंभीर जखमींना  पुढील उपचारासाठी बार्शी येथे पाठविण्यात आले आहे. 

   या आपघातात भूम तालुक्यातील नळीवडगाव येथील मयत मंगेश आत्माराम गायकवाड (वय२६ ) तर बार्शी येथे एका तरुणास उपचारासाठी पाठविण्यात आले असता त्याचाही मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जख्मी झाले आहेत. आपघाती जख्मी मध्ये वैभव भोजणे, शुभम थिटे, प्रतिक भोजणे, विनोद लोखरे, स्वनील भोजणे, नवनाथ हारणे यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथे दाखल करण्यात आले आहेत. तर जख्मी असलेले राहित इनामदार, बिरुदेव हजारे, श्रीकृष्ण झेंडरे, नवनाथ शेवगे सर्व राहणार नळीवडगाव तसेच सावरगाव येथील दादा कांबळे  यांच्यासह उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदरील घटनेचा गुन्हा परंडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

 
Top