मुरुम,  (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील गोरगरीब, होतकरू मुला-मुलींना शिक्षणाची सेवासुविधा निर्माण करून शैक्षणिक संकुलन उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी करणारे विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै. माधवराव (काका) पाटील यांची ९६ वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी रविवारी (ता. १०) रोजी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी    जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, विराट कल्याणी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती अँड. राजासाहेब पाटील, शरद पाटील, प्रशांत पाटील, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे, धनराज मंगरुळे, दत्ता चटगे, गोविंद पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती.                                श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास बापूराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी शरणजी पाटील, विराट कल्याणी, अँड. राजासाहेब पाटील, शरद पाटील, प्रशांत पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन अँड. व्ही. एस. आळंगे, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे, डॉ. सतिश शेळके, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथनी, माजी नगराध्यक्ष रशिद शेख, बबन बनसोडे, श्रीकांत बेंडकाळे, शिवशंकर मठपती, नाईक नगरचे सरपंच योगेश राठोड, प्रमोद कुलकर्णी, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, महावीर नारायणकर, राजशेखर मुदकण्णा, महालिंगप्पा बाबशेट्टी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महाविद्यालयाच्या वतीने परिसरातील गरीब लोकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन विद्यालय आदि ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली.   

 
Top