उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना प्रथम वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेत 15 एप्रिल 2022 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तेव्हा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा यांनी त्यांच्या पात्र पाल्यांचे अर्ज www.ksb.gov.in/www.desw.gov.in या वेबसाइटवर भरून त्याची प्रिंट प्रत (printed copy) तात्काळ कार्यालयात सादर करावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार  यांनी केले आहे.


 
Top