उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मंत्री शंकरराव गडाख व त्यांचे पुत्र गडाख यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गडाख यांच्या समर्थनार्थ व आरोपींना अटक करावे या मागणीसाठी आज नेवासे तालुका कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. संबंधित आरोपी व्यक्तीवर कारवाई व्हावी य मागणीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. नेवासे तालुक्यात अनेकांना 20 परदेशी कट्टे दिल्याचा क्लिपमध्ये उल्लेख असून गडाखांना घरात घुसून ठार मारू अशा प्रकारचे वक्तव्य त्या व्हायरल क्लीप मध्ये आहे. या प्रकारानंतर गडाखांच्या घरावर पोलीस बंदोबस्त वाढवला असून

गडाखांचा मुलगा उदयनलाही पोलीस संरक्षण दिले आहे.

 जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्रीच गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला होता त्यातच पुन्हा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल राजळे यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांना उपचारासाठी पुण्याला रुबी हॉस्पिटलला हलवलं आहे.

 या दोन्ही घटनांनंतर मंत्री शंकराव गडाख यांची प्रतिक्रिया आली आहे. हा राहुल राजळेवर हल्ला नसून माझ्यावर झालेला हल्ला आहे. हा दुर्दैवी हल्ला असून अस काही होईन अस माझ्या मनात ही नव्हते.काही दिवसांपासून खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे, माझ्या विरोधात खोट्या-नाट्या केस दाखल करून आरोप करण्याचे प्रकार सुरू आहेत. माझ्या आणि कुटुंबावर शिवराळ भाषा वापरली जाते. नेवासा तालुक्यातील राजकारण खालच्या स्तरावर चालल आहे, मला संपवण्याचा कट रचला जात आहे. माझा पोलिसांवर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असे गडाख म्हणाले

 
Top