तेर/ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या अविनाश पाडूळे हीने इंग्रजी च्या  लिप फॉर वर्ड , मुंबई आयोजित WPC ( वर्ड पॉवर चॅम्पियनशिप )राज्यस्तरीय Final Round मध्ये यश मिळवत राष्ट्रीय स्पर्धाही जिंकली.

 रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ही इयत्ता ५ वी ची विद्यार्थीनी देशात राष्ट्रीय पातळीवर प्रथम ठरली. पाडूळे हिला लॅपटॉप व बॅग, हेडफोन आणि ब्लु टूथ स्पीकर, रेंजर सायकल, मोबाईल फोन, १७,५०० रुपयाची गिफ्ट कार्ड्स बक्षिसे मिळाली.अनन्या पाडूळे हीला जवळपास ७० हजाराची बक्षिसे पटकावली.   तसेच तेर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेचा विद्यार्थी इंद्रवर्धन शरद गोडगे याने महाराष्ट्र राज्यात 3 रा क्रमांक पटकावला.  जि प प्रा शाळा स्पेशल तेर, तेर च्या विद्यार्थ्यांचे लिप फॉर वर्ड संस्थेच्या इंग्रजी शब्दाच्या WPC ( वर्ड पॉवर चॅम्पियनशिप ) राज्यस्तरीय Final Round मध्ये   इंद्रवर्धन शरद गोडगे हा इ. ३ री चा विद्यार्थी महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.

इंग्रजी शब्दांचा उच्चार,इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग,इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ या तीनही पातळीवर चुणूक दाखवत जिल्हा परिषद स्पेशल शाळा, तेर चा इंद्रवर्धन गोडगे याने हे यश संपादन केले. Final Round पर्यंत जवळपास ४,५०० विद्यार्थ्यांमधून इंद्रवर्धन गोडगे याने उत्कृष्ट सहभाग दाखवत  विजेता ठरला आहे.

रामभाऊ म्हाळगी सभागृह, मुंबई येथे लिप फॉर वर्ड चे प्रणिल नाईक व टीमने गोडगे यांचा सत्कार केला.गोडगे या विद्यार्थ्यांला ब्लुटूथ हेडफोन, ब्लूटूथ स्पीकर तसेच २,५००ची गिफ्ट कार्ड्स मिळाली.त्याला  शिक्षिका  जया देव्हारे यांनी मार्गदर्शन केले.  तसेच तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयाचा विद्यार्थी केदार माने हा राज्यात तृतीय आला.

रामभाऊ म्हाळगी सभागृह, मुंबई येथे लिप फॉर वर्ड चे संस्थापक प्रणिल नाईक व मोतीलाल ओसवाल च्या CSR  मॅनेजर अमिता चौरसिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सत्कार करून बक्षिसे वाटप करण्यात आली.   महाराष्ट्र संत विद्यालयातील इंग्रजी  विषय शिक्षक  गोडगे एस. यू. यांनी अनन्या अविनाश पाडूळे व केदार माने याला मार्गदर्शन केले.

Word Power Championship ची राष्ट्रीय पातळी वर जिंकणारी अनन्या पाडुळे ही उस्मानाबाद जिल्ह्यातून पहिली मुलगी ठरली आहे.

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि बिहार या राज्यातील विद्यार्थ्यांशी  अनन्या पाडुळे हीने स्पर्धा करत विजेती ठरली आहे.यशस्वी विद्यार्थी,विद्यार्थीनीचे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बी. वाय .यादव, उपाध्यक्ष  नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी .टी .पाटील , महाराष्ट्र संत विद्यालयतेरचे मुख्याध्यापक  बळवंतराव एस. एस.यानीही हार्दिक अभिनंदन केले.   

 
Top