सरमकुंडी ता. वाशी येथील खाकी शाह वली या दर्गाहचा व फकिर बाबा या दोन्ही वलींचा संदल कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संदल कार्यक्रमा निमित्त सरमकुंडी गावातून संदल मिरवणूक ही काढण्यात आली.
सरमकुंडी ता.वाशी येथे प्रतिवर्षी पाडव्याच्या दिवशी येथील खाकी शाहवली दर्गाहचा व फकिर बाबा या वलींचा संदल व उरूस हा कार्यक्रम येथील मुजावर बिरादरी च्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात येतो. मागील दोन वर्ष कोरोना या महामारी च्या साथीमुळे हे कार्यक्रम साजरे करता आलेले नव्हते. यावेळी साधे पणाने हे कार्यक्रम घेण्यात आले होते. यावर्षी शासनाने कोरोणा चे सर्व निर्बंध उठवताच येथील सर्व मुजावर बिरादरी च्या वतीने संदल व उरूस हा कार्यक्रम आनंदात व उत्साहाच्या वातावरणात घेण्यात आला. संदल कार्यक्रमाच्या निमित्ताने सरमकुंडी गावातून संदल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सत्तार मुजावर व तय्यबअली मुजावर यांनी कशिदा पठण केले व इतरांनी त्यांना साथ दिली. ही मिरवणूक येथील मुजावर बिरादरीचा मोहल्ला पासून निघून येथील विठ्ठल मंदिर, पाटील यांचा जुना बुरुजवाडा, बागवान गल्ली मार्गे मिरवणूक निघून गांवच्या वेशीतून मोठ्या भक्तिभावाने ती येथील दर्गाह येथे पोहोचली. दर्गाहमधे परंपरा आणि रितीरिवाजानुसार खाकी शाह वली, फकीर बाबा वलीच्या नावाचे नामस्मरण करण्यात आले. या नंतर इतर पूजा करून दोन्ही वलींना संदल चढवण्यात आला. पुजेच्या शेवटी सर्वांना प्रसाद देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी मुसा मुजावर, नजीर मुजावर, सत्तार मुजावर, अफसर मुजावर, युसुफ मुजावर, तय्यब अली मुजावर गुरुजी, पत्रकार एम. आय. मुजावर, हसन मुजावर, ताजोद्दीन मुजावर, इनुस मुजावर, अजीज मुजावर, अब्बास मुजावर, अकबर मुजावर, पुजा पठण करणारे तय्यबअली मुजावर, शब्बीर मुलानी, बाशुमियां मुलानी, अफसर मुलानी, सिकंदर मुलानी, गणी शेख, उस्मान शेख, जाकीर शेख, जुबेर शेख, इरफान शेख, वाशीचे मुन्ना काझी याची प्रमुख उपस्थिती होती. या बरोबरच इतर मुस्लिम व हिंदूबांधव मोठ्या संख्येने हजर होते.