तुळजापुर / प्रतिनिधी-

 लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेची वावर याञा करण्यासाठी शुक्रवार दि २३रोजी नवविवाहीत नवदांम्पत्यांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सुमारे अडीच हजार नवविवाहीत नवदांम्पत्यांनी व त्यांचा सोबत आलेल्या  लाखो भाविकांनी पारंपरिक पुजारी वृदांन कडुन देविजींचा वावर याञेचा कुलधर्मकुलाचार करुन मनोभावे दर्शन घेवुन आपल्या नव्या संसारी आयुष्याश आरंभ केला. 

नवविवाहीत नवदांम्पत, आईय-वडील, बहीण सह नातेवाईक समावेत खाजगी वाहनांनी तिर्थक्षेञी येवुन श्रीगोमुख श्रीकल्लोळ तिर्थकुंडात स्नान करुन जोडीने देविजींची खणनारळ साडीचोळी अभिषेकपुजा गोंधळ पुरणावारणाचा नैवध  सह अन्य वावर याञेचे  धार्मिक विधी सहकुंटुंब देवदेव करुन देविदर्शन घेत आहेत.देवीदर्शन नंतर बाजारपेठेत येवुन देविची मुर्ती फोटो प्रासाद साहित्य खरेदी करुन पुजारीवृंदांन कडे महाप्रसाद घेवुन समाधानाने गावी जात आहे.

 

 
Top