तुळजापुर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आरळी बु. ग्रामदैवत ख्वाजा बंदेनवाज उरूस यात्रेनिमित्ताने भव्य खुल्या निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. याकुस्ती स्पर्धचे  विजेते पद आरळी  बु येशील कोल्हापूर तालमीत कुस्तीचे धडे गिरवणारा कु.महेश नारायण उकरंडे विरुद्ध वानेगावचा मल्ल नामदेव खांडेकर अटीतीची लढतीत महेश उकरंडे यांनी चितपट करुन विजेतेपद पटकावले 

प्रथमता ग्रामदैवत  ख्वाजा बंदेनवाज उरूस यात्रेनिमित्ताने संदल मिरवणूक  काढण्यात आली.यात्रा काळात शोभेचे दारु उडवण्यात आली तर दुसऱ्या दिवशी खुल्या कुस्तीचे आयोजन केले आहे.पंचक्रोशीतील नामांकित पैलवान याठिकाणी हजेरी लावत आपले योगदान दिले.

लोहारा तालुक्यातील गावची कन्या स्वेता कारले (वय 10 वर्ष ) हिने नागुर गावचा लहान मल्ल निखिल जाधव याच्याशी दोन हात करत कुस्ती चितपट केली.या लहानग्या मुलीने वेधले आखाड्याचे लक्ष वेधून घेत टाळ्याची दाद मिळवली.

नामवंत मल्लांच्या निकाली कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी दुपार पासूनच खास तयार केलेल्या कुस्ती आखाड्यात हजेरी लावली होती. हलगी तुतारीचा नाद सर्वत्र निनादत होता,यावेळी प्रथमच तरुण पंच नियुक्ती करण्यात आल्याने तरूणाईमध्ये जोश अन जल्लोष पाहायला मिळाला.या निकाली कुस्त्यांमुळे नामांकित पैलवान व ग्रामीण कुस्ती वस्ताद यांनी आयोजन कमिटीचे कौतुक करून धन्यवाद व्यक्त केले.

 
Top