परंडा / प्रतिनिधी : -

“चला महापुरुषांतील जातीभेद नष्ट करू, शिवरायांचे परिसरात भीमजयंती साजरी करूया”. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा मानस बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केला होता. 

     बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पेतून भीमजयंती निमित्ताने पुस्तक दान, रक्तदान, अनाथांना मदत, संविधान वाचन, तिरंगा पुजन, वृक्षलागवड आदि. समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात यावेत असे आवाहन प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते यांना केले होते.त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील माणिकनगर शेळगाव येथील तीन अनाथ निराधार व्यक्तींना किराणा मालाचे (साखर, शेंगदाणे, तेल  पिशवी,पोहे, बिस्किट्स पॅक.) इ.साहित्य असलेले किट्स मदत म्हणून देण्यात आले.

 यावेळी प्रहार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, परंडा तालुका नेते लक्ष्मण औताडे, प्रहार महिला आघाडी प्रमुख ज्योती देशमुख व विद्यार्थी उपस्थित होते. 

 
Top