उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब शहरातील परळी रोड वरील जयभवानी मंगल कार्यालया येथे आम आदमी पार्टी चा कार्यकर्ते मेळावा घेण्यात आला आहे. या मेळाव्या कळंब येथील शेकडो कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश देण्यात आला आहे. 

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अॅड. अजित खोत होते तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, युवक जिल्हाध्यक्ष आकाश कावळे, युवक जिल्हा सचिव अॅड. रघु गोरे, शहराध्यक्ष अकिब पटले आदी उपस्थित होते. संचालन कैलास ओव्हाळ यांनी केले . समारोप अकिब पटेल, आभार प्रदर्शन संध्या सोनटक्के, प्रास्ताविक भाऊसाहेब खिचडे यांनी मानले.

 
Top