उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुधन आधारित जोडधंद्याकडे वळावे त्यामध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण भरपूर आहे , असे प्रतिपादन तुळजापूरचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) , डॉ . के . ऐ . खाडे यांनी केले . ते कृषि विज्ञान केंद्र , तुळजापूर , आत्मा व कृषि विभाग , उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र , तुळजापूर येथे आयोजित किसान मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून बोलत होते . 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मा , उस्मानाबादचे प्रकल्प उपसंचालक , श्री . किरवले तर मंचावर तालुका कृषि अधिकारी , श्री . संजय जाधव , वनामकृविचे शास्त्रज्ञ डॉ . रमेश पाटील , डॉ.संदेश देशमुख , शेळीउद्योजक श्री.गुंडू पवार तसेच कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक विजयकुमार जाधव होते . पुढे डॉ . खाडे म्हणाले की , शेतकरी हा देशातील सर्वात मोठ्या बँकेचा व्यवस्थापक असून त्याने शेतीशी आधरित जोडधंद्यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे एक ते दोन वर्षात दुपटीपेक्षा जास्तीची वाढ होवू शकते . अशा प्रकारची क्षमता इतर कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये नाही . असेही त्यावेळी म्हणाले . आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वनामकृविचे शास्त्रज्ञ डॉ . संदेश देशमुख म्हणाले की , जिल्हयातील शेतकऱ्यांनी विद्यापीठ निर्मित बैलचलित विविध शेती अवजारांची माहिती घेवून त्यांचा वापर आपल्या शेतीत करावा तसेच सदरील बैलचलीत अवजारे ही ट्रॅक्टर चलीत अवजारांपेक्षा स्वस्त असून सोबतच त्यामुळे पेट्रोल - डिझेल या इंधनाची देखील गरज भासत नाही . शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत जोडधंद्यांची निवड करताना सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करावा , असे प्रतिपादन वनामकृवि , परभणीचे कुक्कुटपालन प्रकल्प अधिकारी डॉ . रमेश पाटील यांनी केले . आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध साधन सामुग्रीचा वापर करून कमी खर्चाचे विविध एकक कृषि विज्ञान केंद्राने तयार केलेले असून त्यांचा अवलंब आपल्या शेतीत जिल्हयातील शेतक - यांनी करावा असेही ते यासमयी म्हणाले . • उस्मानाबाद जिल्हयातील सुप्रसिध्द शेळी उद्योजक श्री गुंडू पवार आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की , जिल्हयातील प्रसिध्द असलेली उस्मानाबादी शेळी महाराष्ट्राच्या बाहेर ८ - ९ राज्यांमध्ये त्यांनी पोहचवली असून , त्यासाठी सतत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहेत . जिथे पिकते तेथे ते विकत नाही अशीच व्यवस्था सध्या उस्मानाबादी शेळीची झाली असून आंध्रप्रदेश , कर्नाटक , तेलंगणा , तमिळनाडू , केरळ आदि राज्यातून उस्मानाबादी शेळीला प्रचंड मागणी असून उत्तर भारतात देखील उस्मानाबादीच्या प्रसाराकरिता लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले . त्यांनी जिल्हयातील

 पशुपालकांना यासमयी त्यांच्याकडून चालविण्यात येत असलेल्या गोट बँक या मोहिमेविषयी सविस्तर माहिती दिली . सदरील शेतकरी मेळाव्याच्या सुरूवातीला भारत सरकारचे कृषिमंत्री मा.नरेंद्र तोमर यांनी देशातील विविध कृषि विज्ञान केंद्रांतंर्गत उपस्थित शेतकऱ्यांशी वेबेक्सच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधत त्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले . सदरील ऑनलाईन कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था जिल्हयातील शेतकऱ्यांकरिता कृषि विज्ञान केंद्राने त्यांच्या सभागृहात केली होती . तसेच सोबतच जिल्हयातील कृषि व पुरक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विविध शेतकरी , महिला शेतकरी , शेतकरी गट , शेतकरी कंपन्या आदिंचा शाल - श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून यथोचित सन्मान कृषि विज्ञान केंद्राकडून करण्यात आला . तालुक्याचे कृषि अधिकारी श्री . संजय जाधव यांनी यासमयी कृषि विभागाच्या विविध योजना तर आत्म्याचे प्रकल्प उपसंचालक श्री . किरवले यांनी आत्मांतर्गत विविध प्रकल्पांची माहिती दिली . या शेतकरी मेळाव्या मागची संकल्पना कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक श्री विजयकुमार जाधव यांनी सुरूवातीस मांडली . सदरील मेळाव्याचे सुत्रसंचालन शास्त्रज्ञ प्रा . वर्षा मरवाळीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ . श्रीकृष्ण झगडे यांनी केले . सदरील मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.भगवान आरबाड , प्रा.गणेश मंडलिक , प्रा . अपेक्षा कसबे , डॉ . नकुल हारवाडीकर , श्री . शिवराज रूपनर यांनी तर आत्म्याचे श्री . राहूल लोंढे यांनी प्रयत्न केले .


 
Top