तुळजापूर / प्रतिनिधी-
 आमदारांची विधिमंडळ अंदाज समिती उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आली असता त्यांनी शुक्रवार दि. ७ रोजी प्रथमता श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन  नंतर पाहणी दौऱ्यास आरंभ केला.गुरुवार व शुक्रवार या दोन्ही दिवशी जवळपास 25 आमदारांनी श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतले .शुक्रवार सकाळी या आमदारांनी देवीदर्शन घेतल्यानंतर  यातील काही आमदारांनी तुळजापूर तालुक्यातील काञी  गावास भेट देवुन  चालु असलेल्या  विकास कामांची पाहणी करुन स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला असता  अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची तक्रार करण्यात आली. 

 त्यानंतर  काञी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल कामाला  भेट दिली व तेथील कामाची पाहणी  आमदार संजय गायकवाड, आ. संजय सिरसट, आ. सतिश चव्हाण सह अन्य आमदारांनी  केली. यावेळी पुलाचे काम नियमानुसार व दर्जदार करण्याची सुचना दिली. यावेळी अतिवृष्टीमुळे जमिनी खरडुन गेल्या असुन त्याची तरतुद कमी आहे. यावर चर्चा झाली  

यावेळी आपसिंगा ग्रामपंचायत सदस्य  अमीर शेख यांनी अतिवृष्टीत  गाळाने विहरी भरुन नुकसान झाली पण त्या बाबतीत अद्याप मदत मिळाली नसल्याचे  आमदारांच्या कानावार घातले असता  यावर त्यांनी एमआरईजीएस मध्ये हे काम घ्या ६०/४०मध्ये टाका तुम्हाला अधिकार आहे असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तहसिलदार सोदागर सांळुके, मुख्याधिकारी अरविंद खातू सह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी ऊपस्थीत होते.

२५ आमदारांनी घेतले देवीदर्शन 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अंदाज समितीच्या दौऱ्यावर आलेल्या पैकी २५ आमदारांनी गुरुवार व शुक्रवार रोजी   श्रीतुळजाभवानी चे दर्शन घेतले. यात  बुलढाणा आ.   संजय गायकवाड, रायगडचे आमदार भारतशेट गोगावले, नागपूरचे आमदार विकास कुंभार, मुरबाडचे आमदार किसन शंकरराव कथोर  यांनी    श्रीदेवीजींचे दर्शन घेतले मंदिर संस्थानच्या वतीने मा तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन योगिता कोल्हे यांनी श्री देवीची प्रतिमा, साडी, फोटो, कवड्याची माळ, श्री तुळजाभवानी पुस्तक, श्रीफळ व खडीसाखर प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला आहे.

 यावेळी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे, सह कर्मचारी उपस्थितीत होते.

 
Top