उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद येथून एस.टी.विभागातर्फे 10 ते 12 एप्रिल कालावधीत श्री शिखर शिंगणापूर, पढरपूर , चैत्र पोर्णिमा तुळजापूर आणि श्री.येडेश्वरी येरमाळा यात्रांसाठी दि.10 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत खालील आगारातून प्रवाशांच्या भाविकांच्या सोईसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हयातील उस्मानाबाद आगारातून 25 बसेस,उमरगा आणि परंडा स्थानकातून प्रत्येकी पाच तसेच भूम येथून 15 तसेच तुळजापूर आणि कळंब या आगारातून 20-20 जादा गाडया सोडण्यात येतील प्रवाशी आणि भाविकांची गर्दी विचारात घेवून पंढरपूर,शिंगणापूर,तुळजापूर,येरमाळा या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जादा बसेसची सोय करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक रा.प.उस्मानाबाद यांनी कळविले आहे.