उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  तालुक्यातील वाघोली येथील जैनुल आबेद्दीन दर्गाहासह परिसर युवा नेते विनोद बाकले यांच्या पुढाकारातून उजळून निघाला असून स्वखर्चातून हायमस्ट लॅम्पची उभारणी करण्यात आली आहे. आता रात्रीच्या वेळीही दर्गाहसह परिसर हायमस्टच्या उजेडात उजळून निघत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. श्री. बाकले यांनी शब्द देवून तो पूर्ण करून दाखविल्याने हिंदु-मुस्लिम भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

वाघोली येथे जैनुल आबेद्दीन यांचा दर्गाह आहे. हिंदु-मुस्लिमांच्या एकतेचे प्रतिक म्हणून दर्गाहाची ओळख आहे. दर्गाहसह दफनभुमीत प्रकाशाची व्यवस्था अत्यंत अपुरी होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत होते. तसेच उरूसानिमित्त रात्री कार्यक्रम घ्यायचा म्हटले तरी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागायचा. त्यामुळे दर्गाहसह परिसराची पाहणी करण्याची विनंती नागरिकांनी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्याकडे केली होती. पाहणी दरम्यान याठिकाणी हायमस्ट लॅम्प उभारण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखविली. याची दखल घेवून विनोद बाकले यांनी तातडीने शब्द दिला की लवकरच हायमस्ट लॅम्प उभारला जाईल आणि तो शब्दही पूर्ण करून दाखविला आहे. गुरूवारी दर्गाह परिसरात हायमस्ट लॅम्पची उभारणी पूर्ण करून तो सुरूही करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी पसरणारा अंधार आता दूर झाला असून हायमस्ट लॅम्पच्या उजेडात दर्गाहसह परिसर उजळून निघाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  केवळ शब्द दिलाच नाही तर तो अवघ्या काही दिवसात पूर्ण करून दाखविल्याबद्दल हिंदु-मुस्लिम बांधवांच्या वतीने सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकलेे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 

 
Top