उस्मानाबाद - हिंदु-मुस्लीमामध्ये दरी निर्माण होण्याच्या काळातच तालुक्यातील तेर येथे मात्र या हेतुला दोन्ही धर्मातील नागरीकांनी बाजुला सारत आपला बंधुभाव टिकविण्याची  परंपरा अबाधित ठेवली आहे. रमजाननिमित्त ग्रामस्थाच्यावतीने इफ्तार पार्टीचे तर मुस्लीम समाजाच्यावतीने संत गोराबा काकांच्या यात्रेत येणार्‍या सर्व पालखीतल्या वारकर्‍यांना फळे व सरबत वाटप करुन आपली परंपरा कायम राखली आहे. दरबार गल्ली येथे दरवर्षीच रमजान व यात्रेचा हा उत्सव दोन्ही धर्म अत्यंत उत्साहात साजरे करतात. यावर्षीही हा उत्सव मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आहे. 

सोमवारी संध्याकाळी इफ्तार पार्टी आयोजीत केली.यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील,माजी नगरसेवक सोमनाथ गुरव,बाळासाहेब काकडे,काँग्रसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,जनता बँकेचे संचालक आशिष मोदाणी,राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विश्वतेज प्रतिष्ठान चे रहेमानभाई काझी,शिवसेनेचे  माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे,पांडू भोसले, पत्रकार महेश पोतदार, कुणाल धोत्रीकर,एच.एम.देवकते, रियाज कबीर,बाबूराव नाईकवाडी, महादेव खटावकर,भास्कर माळी, राजाभाऊ आंधळे,नामदेव कांबळे, अविनाश इंगळे,काका राऊत, डॅा.के.बी.बाहेती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तर मुस्लीम बांधवाच्यावतीने  माजीद काझी, मुखतार काझी,नावेद कबीर,नासेर मासूलदार,मुसैब काझी,शाकेर मुलाणी,अनसार मासूलदार,फारूख शेख,दाऊद बागवान,सुफयान बागवान,फैसल काझी,आदी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी त्याच ठिकाणी संत गोरोबा काकांच्या पालखीत सहभागी वारकरी यांना फ़ळे व सरबत वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. एका बाजुला राज्यात बोंगा,हनुमान चालीसा आदि मुद्दयावरुन खंडाजंगी होताना दिसत आहे पण तेरमध्ये दोन्ही धर्माच्या नागरीकांनी आपली परंपरा राखुन त्याला एकप्रकारे प्रतिउत्तर दिले आहे.

 
Top