परांडा / प्रतिनिधी : - 

जात प्रमाणपत्राच्या जाचक अटी रद्द करून तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावेत यासाठी परांडा तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी भूम यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली   निवेदन देण्यात आले.

मागासवर्गीय समाजातील sc, St, OBC, कुटुंबातील नागरीकांना शिक्षण आणि शासकीय योजना आदी बाबत जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असताना परांडा शहर आणि तालुक्यातील कुटुंबांना  उपविभागीय अधिकारी भुम यांनी जाचक अटी लादल्या मुळे नाहक त्रास होत आहे. यापूर्वी च्या अधिकाऱ्यांनी ज्या नियमाने जातीचे प्रमाणपत्र दिले त्याच धर्तीवर प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच  शालेय पुरावा व रक्त नात्यातील जात प्रमाणपत्राचा पुरावा जोडून हि इतर पुराव्यांची मागणी करून वेळ काढू चे धोरण अवलंबिले जात असल्याने मागासवर्गीय समाजातील लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याचे दिलेल्या

निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, तालुका अध्यक्ष विक्रम जाधव, जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे,ता.कार्याध्यक्ष रंगनाथ ओहाळ, ता.उपाध्यक्ष कुंडलिक शिंदे,शहराध्यक्ष अजय बनसोडे, 

महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष श्रीमती लक्ष्मी सरवदे,दत्ता सरवदे, हरी साळवे, अमोल ओहाळ, कानिफ सरपने, राजेंद्र जाधव, बाळासाहेब कांबळे, अमोल गायकवाड, बाप्पा गायकवाड, साजन बनसोडे , कुणाल शिंदे, अजय बाबासाहेब बनसोडे,  अतुल धेंडे, अक्षय चौथमहल, सिद्धांत वाघमारे, रणजीत नागटिळक, हर्षवर्धन पाटील, सचिन भोसले, नितिन ओहळ, दतात्राय गायकवाड , शिवम माने , किशोर हावळे, रवींद्र नलावडे, सनी( नहन्या) चौथमहाल , दशरथ जाधव, भैरवनाथ यादव, रवी गायकवाड ,कृष्णा चौधरी, सुनील सुरवसे , कैलास माने,  दिपक ओहाळ, अक्षय थोरात , यश धावारे , रुपेश बनसोडे, अभिजित नलावडे , सुमित गायकवाड अमोल सरवदे यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपास्थित होते.


 
Top