परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील अनाळा येथील कालिका ज्वेलर्स मालक तथा सर्व शाखीय सोनार संघटनेचे राज्य संघटक विनोद चिंतामणी यांनी सर्व शाखीय सोनार संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष अमोल शहाणे यांचा कालिका ज्वेलर्स ला भेट दिली असता शाल, श्रीफळ , फेटा बांधून सत्कार केला. 

यावेळी संघटनेचे राज्य संघटक विनोद चिंतामणी व अमोल शहाणे यांनी संघटेनेच्या व समाजाच्या विविध विषयावर चर्चा केली . संघटनेचे कार्य महाराष्ट्र भर कार्यरत ठेवण्यासाठी सर्वानी एकदिलाने  कार्य करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विनोद चिंतामणी यांनी केले. संघटना वाढीसाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे सांगितले .


 
Top