उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आपल्या विविध मागण्यांसाठी उस्मानाबाद जिल्हयात वीज कंपनीच्या ३९ संघटनेने २८ व २९ मार्च संप पुकारला आहे. तर महसूल कर्मचारी सुध्दा आपल्या विविध मागण्यांसाठी दि. २८ मार्च रोजी लाक्षणीक संप केला आहे. विशेष म्हणजे मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा वीज कंपनी व महसूल कर्मचारी संघटनेने दिला आहे. 

महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने रखडलेले प्रमोशन तात्काळ दयावे, राज्यातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे तात्काळ भरावी आदी मागण्यासाठी २१ मार्चरोजी निदर्शने केली. त्यानंतर २३ मार्च नंतर काळ्या फिती लावून कामकाजात केले. या संदर्भात प्रशासन सकारात्मक नसल्यामुळे २८ मार्च रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संप करण्यात आला. सरकार ने सकारात्मक भूमिका न घेतल्यास चार एप्रीलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महसूलच्या विविध कर्मचारी संघटनेने दिला आहे. 

खाजगीकरण रद्द करा

खासगीकरण रद्द करा, सुधारणा देयके रद्द करा, अनावश्यक पदे निर्मती बंद करा, जलविद्युत केंद्र जलसंपदाकडे वर्ग करून खासगीकरणाचा डाव बंद करा, कंत्राटी कामगार कायम करा आदी मागण्यांसाठी वीज कंपनीच्या विविध संघटनांनी २८ ते २९ मार्च अशा प्रकार सलग दोन दिवसांचा संप पुकाराला आहे. प्रशासन व सरकार सकारात्मपणे भुमीका न घेतल्यास यापुढे बेमुदत संप होईल, अशा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. 


 
Top