उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आज जगभरात भयावह वातावरण असुन युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशातील युध्दामुळे आज समस्त जगातील देशांना आर्थिक फटका बसत असून याचा फार गंभीर परिणाम जाणवत आहे.

 युक्रेन येथे वैद्यकिय शिक्षण अल्पदरात होते त्यामुळे अनेक देशातील विद्यार्थी येथे वैदयकिय शिक्षण घेण्यासाठी वास्तव्यास असतात, त्यामध्ये भारतातील हजारो विद्यार्थी या युक्रेन देशात अडकले होते. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने मिशन गंगा चालू करून युक्रेनमधील सुमारे 15 हजाराहुन जास्त विद्यार्थी आज मायदेशी भारतात परत आणले.

   महाराष्ट्रातील सुद्धा हजारो विद्यार्थी आज सुखरूप घरी परतले आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील 11 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले होते, त्यापैकी काल ढोकी येथील निकीता निवृत्ती थिटे ही सुखरूप घरी पोहचल्यावर आ. राणाजगजितसिंह पाटील व आ. सुजितसिंह ठाकुर याच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी निकीता च्या घरी जाऊन तिची भेट घेतली व सुखरूप घरी परतल्यामुळे तिचा यथोचित सत्कार केला.

   नितीन काळे यांनी निकितास घडलेल्या प्रसंगाविषयी विचारपूस केली, तेंव्हा निकीताने सांगितले कि आज भारतीय असल्याचा अभिमान वाटत असुन  पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन गंगा मुळेच विनामुल्य सुखरूप घरी पोहचु शकलो. निकीता सांगताना म्हणाली की, जेव्हा रशीयाचे बॉबहल्ले चालु होते तेव्हा बंकरमधून जीव मुठीत घेऊन 30-35 किलोमिटर चालत आम्ही रोमानिया बॉर्डरवर आलो. आणि मग विमानात बसुन दिल्ली ला आलो, तेंव्हा आम्ही सुटकेचा श्वास घेतला, त्यानंतर दिल्ली येथून पुणे येथे सोडण्यात आले आणि नंतर आम्ही आमच्या घरी आलो असल्याचे सांगितले. हे सर्व सांगत असताना निकीताच्या चेहऱ्यावर आपण भारतीय असल्याचे आणि या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे समाधान ठळकपणे दिसत होते. निकीता, तसेच निकीताचे शिक्षक आईवडील यांनी मोदी सरकारचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

 याप्रसंगी भाजपाचे निहाल काझी, प्रमोद देशमुख, झुंबर बोडके, ओम नाईकवाडी, नामदेव नायकल तसेच पदाधिकारी व निकीताचे कुटुंबीय उपस्थित होते.


 
Top