तुळजापूर / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्याचे साबां मंञी अशोक चव्हाण हे तुळजापूर दौऱ्यावर आले असता त्यांना  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आ. मधुकर चव्हान यांनी तीन  पुल बांधकाम, दहा रस्ते सुधारणा कामासाठी पन्नास कोटी सत्तर लाख रुपये निधी देण्याची मागणी केली .

 होनाळा गावा जवळ जवळ पुल बांधकाम करणे ,   नंदगाव गावा जवळ पुल बांधकाम करणे  ,. बारुळ गावा जवळ पुल बांधकाम करणे, रस्ते सुधारणा  आरळी खु . ते चिवरी रस्ता  ,दहिवडी ते सावंतवाडी रस्ता  , पिंपळा बु . ते देवकुरुळी  , काक्रंबा ते जवळगा मे  रस्ता,  किलज ते मुर्टा , पांगरदरवाडी ते काटी रस्ता  , चिवरी ते अणदूर, अणदूर ते खुदावाडी रस्ता , गंधोरा ते बसवंतवाडी रस्ता , जवळगा मे ते सलगरा दि . रस्ता  असे एकुण  50 कोटी 70 लक्ष रुपये निधी मागणी केली .तसेच  तुळजापूर सर्किट हाऊस चे विस्तारीकरण करणे ,  मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे, आरळी बु . ते काळेगाव रस्त्याच्या  नकाशामध्ये समावेश करुन सुधारणा करण आदी मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.

या वेळी माजी आ मधुकर चव्हाण, आ. अमर राजुरकर,  जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सुनिल चव्हाण, युवक काँग्रेस सरचिटणीस अभिजीत चव्हाण, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण,  सरपंच  अशोक पाटील,  दिलीप सोमवंशी,  बालाजी मोकाशे, धनराज मुळे, पंडीत जोकार , गंगप्पा यादगौडा हगलगुंडे आदी उपस्थिती होते. 

 
Top