उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे वेलफेअर सोसायटी उस्मानाबादच्या वतीने आयोजित सामुदायीक विवाह सोहळ्याचे हे चौदावे वर्ष  होते. हजरत खाजा शमशोदीन गाजी दर्गा मैदानात विवाह सोहळा मोठया थाटात संपन्न झाला . सोसायटीचे अध्यक्ष हाजी नादेरूल्ला हुसैनी सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सर्व सन्माननीय सदस्य , मौलाना , डॉक्टर , इंजीनियर्स सामाजीक कार्यकर्ते व वन्हाडी मंडळी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठया थाटात संपन्न झाला .      

या सोहळ्यातील जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य प्रदान केले जाते, तसेच सर्व वऱ्हाडी मंडळीस स्त्रि /पुरुष स्वतंत्र भोजन व्यवस्था केली जाते .  याकामी बाबा मुजावर , शेख गयासूद्दीन ,जे के दादा ,वाजीद पठाण , शेख अयुब व इतर मान्यवर तसेच स्वयंसेवक काझी, शिक्षक ,समाज बांधव उत्स्फुर्त पणे सहभागी होऊन शिस्तीत कार्यक्रम पार पाडतात .      कार्यक्रमाचे प्रास्ताविकात अध्यक्ष हाजी नादेरूल्हा हुसेनी यांनी सोसायटी सन २००९ पासून कार्यरत असून संस्थेमार्फत आजतागायत  ५८४ विवाह संपन्न केल्याचे जाहीर केले , तसेच सोसायटीच्या वतीने समाजातील गरजू मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केल्याचे विषद केले , अत्तापर्यंत ११० मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण केले असून त्यांचा सर्व खर्च सोसायटी मार्फत केल्याचे स्पष्ट केले . चालू वर्षातही ६४ मुले उच्च शिक्षण घेत असून त्यांचा सर्व खर्च सोसायटी करणार आसल्याचे स्पष्ट केले . तसेच सोसायटी आरोग्य क्षेत्रात ही काम करत असून कोव्हीड काळात रुग्णांची गरज लक्षात घेऊन एक अँम्बूलन्स  रुग्णसेवेसाठी सूरू करण्यात आली व ती विना मोबदला सुरू आहे , तसेच रमजानच्या काळात गरजूंना धान्य किट वाटण्याचे कार्यहि संस्था करते , यापुढेही समजाच्या गरजा लक्षात घेऊन पुढे कार्य करत राहू असा मानस असल्याचे सांगीतले .        

या वेळी मौलाना जाफरअली खान सहाब यांनी कुरआनच्या तत्त्वानुसार विवाह कमी खर्चामध्ये व साध्या पध्दतीने करण्याचे आवाहन युवक व समाजबांधवांना  केले , तसेच मोलाना अयुब सहाब यांनीही सर्वाना कुरआन चे संदेश दिले , नात मौलाना सलीम सहाव यांनी सादर केली , कारी इस्माईल सहाब यांनी दुआ पठण व नवविवाहीत जोडप्यांना शुभाशिर्वाद दिले , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेख शागीर्द सर यांनी केले .


 
Top