उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आताच काही दिवसांपूर्वी देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी ला 4 राज्यात घवघवीत यश मिळाले आहे. या 5 राज्यातील उत्तर प्रदेश निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा उत्तर प्रदेश मुख्यमंत्री व्हावेत. यासाठी बीड येथिल रहिवासी हभप विष्णु महाराज सुरवसे यांनी पंढरपूर ते वाराणसी आयोध्या श्रीराम  जन्मभूमी अशा भव्य रथयात्रा करण्याचा संकल्प केला होता, आणि उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत.  त्यानुसार संकल्पपूर्ती करण्यासाठी या रथयात्रेस त्यांनी प्रारंभ केला असून  ही रथयात्रा पंढरपूर ते वाराणसी ते अयोध्या असा १४ दिवसाचा प्रदेश प्रवास करून श्रीराम नवमीच्या आदल्या दिवशी दि. ९ एप्रिल या दिवशी श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे पोहोचणार आहे.

 रथयात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात 28 मार्च रोजी तुळजापूर येथे मुक्काम करून 29 मार्च रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे आगमन झाले.

 याप्रसंगी भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद  जिल्ह्याचा वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील व आ सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी भाजपच्या पदाधिकार्या समवेत  हभप विष्णु महाराज सुरवसे व राथयात्रेतील सहकारी वारकरी भक्तांचे हार शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करून त्यांना पुढील राथयात्रेस शुभेच्छा देण्यासाठी उस्मानाबाद शहरातील भाजपचे  युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओम नाईकवाडी, संदीप इंगळे, सुनील पांगुडवले, रोहित देशमुख, सुरज शेरकर, मेसा जानराव, जगदीश जोशी, यांच्यासह  राथयात्रेतील सहकारी वारकरी भक्त शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित होते.


 
Top