तेर /  प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे   ग्रामपंचायत कार्यालयासमोर हट बाजारात अंगणवाडीतील लहान बालके भाजी आणि फळ घेऊन विक्रिसाठी बसली होती. मुलांना लहानपणा पासुन भाजीची ,फळाची ओळख व्हावी, त्यांनी आवडीने खावे तसेच फळाचे आणि भाजीचे रंग माहीत व्हावे म्हणुन बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. 

या हट बाजारमध्ये अंगणवाडी क्रमांक 2,7,8,10,11,12,14 मधिल  विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले होते. हट बाजार यशस्वीतेसाठी अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे, अर्चना सोनवणे,लतिका पेठे,रईसा बागवान ,रोहिणी  कांबळे, प्रभावती वाघमारे, सरोजा वाघमारे,शेख  व ,मदतनिस, महादेवी शिंदे, आश्विनी खंदारे,रेणु शिंदे, सुशीला वगरे,,आश्विनी भक्ते, मीरा खरात,पद्मिन माने,सरस्वती खंडागळे , आशा स्वयंसेविका स्वाति पवार यांनी परीश्रम घेतले.


 
Top