उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरातील श्री सिध्दीविनायक परिवारातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी राजमाता जिजाऊ, देवी अहिल्यादेवी, माता रमाई, राणी लक्ष्मीबाई व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

 या कार्यक्रमास अध्यक्षा सौ.डॉ. दिपीका सस्ते मॅडम तर प्रमुख पाहुण्या सौ. प्रेमाताई सुधीर पाटील (नगरसेविका) जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सारिका खोत- काळे, सौ राणी पवार (नगरसेविका), ॲड.दिपाली जहागीरदार, ॲड.अर्चना मगर-नवले, ॲड.अंजली कोरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी महिलांचे आरोग्य या विषयी डॉ.सौ.दीपिका सस्ते मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन सहाय्यक अधिकारी सौ.अमृता कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन सौ.राधिका तानवडे यांनी मानले. या कार्यक्रमास सौ.दीपाली कुलकर्णी सौ.रोमा कोरे, सौ.पल्लवी माशाळकर, सौ.जया भोसले व शहर परिसरातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 
Top