उमरगा/ प्रतिनिधी-

 युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्द परिस्थितीत आपला जीव मुठीत धरून मायदेशी परतण्यासाठी धडपड करणारे उमरगा शहरातील सागर सोनकाटे  गुरुवारी ( दि ३ ) रोजी सायंकाळी मुबंई येथे  सुखरूप पोहचले. इकडे आई, वडील व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला होता.

जींकडे पहावे तिकडे स्फोट, आकाशात हेलिकाॕप्टर, विमानाच्या घिरट्या, अक्राळ विक्राळ आगडोंब, कर्कश आवाज, नागारिकांचा जिव वाचवण्यासाठी आक्रोश अशा स्थितीत आपला देश कसा गाठेल एवढीच दिवास-रात्र चिंता. देश गाठला म्हणजे गाव गाठला अशी उर्मी मनात बाळगून मित्र मिळून मिनी बस केली. त्यावर तिरंगा झेंडा लावून   बसच्या माध्यमातून एक हजार  किलोमीटर प्रवास २० तासात करून हंगेरी गाठले तेथील भारतीय वायुसेनेच्या मदतीने दिल्लीला उतरलो अन् सुटकेचा निश्वास सोडला. मायदेशी आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर होऊन भावूक झाला.  सुखरूप बाहेर काढल्याबद्दल भारत सरकारचे विशेषता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो असे ते म्हणाले .मी तिरंग्याला सलाम करतो कारण तिरंगा झेंडा  यामुळेच माझ्यासहं पाकिस्तान मधील विद्यार्थीही तिरंगाचा आसरा घेत होते. माझ्यासारखे भारतातील बंधू-भगिनी जे अजूनही अडकले आहेत त्यांना लवकरात लवकर भारत सरकारने विविध माध्यमातून सुखरूप परत आणावे ही भारत सरकारला विनंती केली आहे.ही प्रतिक्रिया होती सागर सोनकाटे यांची ते सध्या एमबीबीएस शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहेत. 

युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या सागरच्या काळजीने उमरगा येथील सोनकाटे कुटुंबीय अक्षरशः हतबल व चिंताग्रस्त झाले होते. प्राध्यापक असलेले अप्पाराव सोनकाटे यांचा सागर हा  मुलगा शिक्षणासाठी डोनेसक युनिव्हर्सिटी युक्रेनमध्ये होता. युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सोनकाटे कुटुंब अधिकच चिंताग्रस्त होते. मागील आठवड्यापासून सोनकाटे कुटुंबीय सागरच्या आगमनाची आतूरतेने वाट पाहत होते. मुबंई येथे परत आल्यावर आईवडील नातेवाईकांनी आनंद साजरा केला.

 
Top