तुळजापूर/ प्रतिनिधी- 

 तालुक्यातील कदमवाडी येथील ट्रँक्टर ने तिर्थक्षेञ  पंढरपूरला  एकादशीनिमित्ताने  निघालेल्या वारकऱ्यांवर सोलापुरातील कोंडी गावाजवळ वारक-यांचा  ट्रँक्टरला ट्रक ने धडक दिल्याने यात ट्रँक्टर मधील चार वारकरी ठार झाले  होते. या अपघातातील दोन महिला वारकरी कोमात गेल्या होत्या त्यांचे शनिवार दि20रोजी सकाळी आठ वाजता उपचार चालु असताना  शासकीय रुग्णालय सोलापूर येथे  निधन झाले .

या अपघातात मरण पावल्याल्यांची संख्या आता सहा झाली आहे. शनिवार दि. १९रोजी  सत्यभामा दिलीप मिसाळ ( 55 ), जनाबाई फुलचंद घाडगे यांचे निधन झाले.  शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर शनिवारी सांयकाळी कदमवाडी व रायखेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top